100+ Birthday Poems in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आपल्या आयुष्यातील विशेष क्षणांना साजरे करण्यासाठी नयनरम्य कविता हवी का? वाढदिवस हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याचा आनंद आपण आपल्या प्रियजनांसोबत शेअर करावा लागतो. या वाचनात, आम्ही तुम्हाला १०० हून अधिक संग्रह देणार आहोत Birthday Poems in Marathi, जेणेकरून तुम्ही तुमचा वाढदिवस किंवा तुमच्या मित्रांचा वाढदिवस एक खास अनुभव बनवू शकाल. याद्वारे, तुमच्या भावना सर्जनशीलतेने व्यक्त करण्याचा एक अद्वितीय मार्ग सापडेल.
वाढदिवस कविता मराठी
एक तारा असा चमकावा की
ज्यात तु नेहमी असावा,
तुझ्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्न पडावा.
तुझा वाढदिवस मंगलमय असो
भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
हसत राहा.. बहरत राहा.. कर मनातील पूर्ण इच्छा
वाढदिवसाच्या तुला मित्रा आभाळभर शुभेच्छा —
निर्भेळ हसू चेहऱ्यावरचं तुझं अखंड फुलत राहो…
काम हातून असे व्हावे सुगंध सर्वत्र दरवळत राहो…
जन्मदिनी आज व्हावी आनंदाची उधळण…
मित्र मैत्रिणी नात्या-गोत्यात तशीच सुखाची पखरण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तिमिरात असते साथ तुमची,
आनंदात तुमचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम तुमचा सल्ला असतो.
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आई – बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
मिळो तुला हा उपहार,
आनंद होवो Double
आणि ऐशर्य मिळो अपार
येणारा प्रत्येक क्षण,
आणो सुख अफाट
सोबत असो आपले,
न मिळो दुःख दाट
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
साद ही तुझ्या मनाची नेहमी
माझ्या मनापर्यंत ठेवायची,
मैत्रीची ही घडी
अनंत काळासाठी आपण जपायची
वाढदिवसाच्या अनंत मंगलमय शुभेच्छा

वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा …
वाढदिवस एका संयमी मनाचा……
वाढदिवस एका उज्ज्वल भविष्याचा….
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा….
वाढदिवस एका कुशल संघटकाचा….
वाढदिवस एका सुसंस्कृत विचारांचा….
वाढदिवस आमच्या काळजाचा ….
वाढदिवस राजबिंडा व्यक्तिमत्त्वाचा ….
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा ….
वाढदिवस आपल्या माणसाचा ………
वाढदिवस आमच्या प्रिय भाऊचा….
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!… .
मोरपिशी आयुष्यातील
सुखाचे क्षण उपभोगताना
जबाबदारीही हलकेच
गळ्यात पडते
आणि
मग खरी कसोटी पणाला लागते.
या उंबरठ्यावर आज तू उभा आहेस
एक पाय आत आणि एक पाय बाहेर.
आजवरचे आयुष्य
आई-वडिलांच्या सावलीत गेले
त्यांच्यासाठी भविष्यातील सावली
तुला निर्माण करायची आहे…
या अधिकच्या जबाबदरीसह
तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…??
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Unique Birthday Poems in Marathi
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
तुझ्या वाढदिवशी तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.
( फ़क्त मैत्री ✍ )
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा
हवेहवेसे वाटणारे क्षण
नकोसे वाटतात तुझ्या विरहात..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes Kavita in Marathi
आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
भाऊ व बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आयुष्याचे GOAL असो आपले CLEAR
तुम्हाला यश मिळो WITHOUT ANY FEAR
प्रत्येक क्षण आपण जगावा WITHOUT ANY TEAR
ENOJY THE BIRTH DAY MY DEAR BROTHER
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
आनंदाने आज केक
कापला जाईल
खाण्यापेक्षा जास्तच
तुझ्या चेहऱ्याला लावला जाईल.
हॅपी बर्थडे
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
वाढदिवस एका दिलखुलास व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस आमच्या मित्राचा
वाढदिवस एका दिलदार मनाचा
वाढिवस मित्रहून मोठ्या असणाऱ्या आमच्या भावाचा
मिळो सर्वांचे प्रेम आपणास
सुखसमृद्धी आणि आनंदी असो मन
आयुष्यात राहो नेहमी बहर,
बहरत राहो आनंदाने आपले जीवन
काही माणसं ओजळीतल्या सुगंधी फुलासारखी असतात
ज्यांच्या क्षणभराच्या सहवासाने देखील आयुष्य सुगंधी होत असते.
अशीच व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आमच्या
प्रिय ताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.
निष्कर्ष
वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील एक खास दिवस असतो, आणि या विशेष दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना दिलेल्या शुभेच्छा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतात. मराठी कवितांच्या माध्यमातून आपण हे भावनेने व्यक्त करू शकतो. कविता त्यांच्या आनंदात आणि विशेषत्वात भर घालते. याचाच वापर करून, आपण आपल्या मित्र, परिवार आणि आवडत्या व्यक्तींच्या वाढदिवसाला एक अर्थपूर्ण स्पर्श देऊ शकतो. काही सुंदर लिहा किंवा पाठवा Birthday Poems in Marathi आज तुमच्या विचारांनी आणि शुभेच्छांनी त्यांचा दिवस खास बनवण्यासाठी!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
What is the best Birthday Message in Marathi?
The best birthday message in Marathi often expresses love, joy, and blessings. A popular choice is: “तुझ्या वाढदिवसाला आनंद आणि यश मिळो!”
How to wish a Birthday in a Poetic way?
तुम्ही हृदयस्पर्शी भावना, निसर्गाची प्रतिमा आणि वैयक्तिक स्पर्श यांचा समावेश करू शकता. ते सुमधुर बनवण्यासाठी यमकांचा वापर करा, जसे की ऋतू किंवा स्वप्नांचा संदर्भ देणे.
What is the Birthday poem of Rabindranath Tagore?
रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांमध्ये अनेकदा प्रेम आणि जीवनाचे विषय शोधले जातात. जरी त्यांच्या वाढदिवसाची विशिष्ट कविता नसली तरी, “गीतांजली” सारख्या त्यांच्या रचनांमध्ये खोल भावना आहेत.
How to write a Heart-touching Birthday poem?
वैयक्तिक आठवणीने सुरुवात करा, वाढदिवसाच्या व्यक्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अद्वितीय गुणांचा समावेश करा आणि त्यांच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन शेवट करा.
